उत्सव - श्रावण षष्टी
या तीर्थक्षेत्रावर दुसरी मोठी यात्रा भरते ती म्हणजे श्रावण षष्ठी यात्रा. श्रावण शुद्ध षष्ठीला चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला. त्यासमयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल, वाळ्याने (खस ) पूजा केली. तेंव्हापासून आजतागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून देवीची लिंबू, बेल, फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते. या यात्रेचे वैशिष्ट्य असे कि, भर पावसातही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात . या यात्रेत फक्त धुपारती सोहळा निघतो. हि यात्रा रातभर असते. मंदिरात रात्रभर देवीचा जागर केला जातो. पहाटे धुपारती सोहळा निघून अंगारा वाटप झाल्यानंतर या यात्रेची सांगता होते.