E - Pass News Update

कोल्हापूर जवळील ठिकाणे

temple

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी, कोल्हापूर

shape

कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर हे, विविध हिंदू पुराणात वर्णिलेल्या १०८ शक्तिपीठांपैकी व महाराष्टातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुक असून त्याचे महाद्वार हे पश्चिमकडे आहे. या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडे असलेल्या मोठ्या घुमटाखाली श्री महालक्षीमीची मूर्ती असून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोट्या घुमटाखाली महाकाली आणि महासरस्वतीची मूर्ती आहेत.

श्री महालक्ष्मीचा नवरात्रौउत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्रात नऊ दिवस विविध रूपात श्री महालक्ष्मीची पूजा बांधण्यात येते व अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. श्री महालक्ष्मी हे जागृत देवस्थान असल्यामुळे सर्वकाळ या मंदिरात भाविकांचा ओघ असतो.

(श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)

shape

पन्हाळा

सुमारे १२०० वर्षांचा इतिहास लाभलेला 'पन्हाळा' हा किल्ला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या किल्यांपैकी एक आहे. इ. स. ११७८-१२०९ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतः या गडावर ५०० दिवसांपेक्षा जास्त दिवस वास्तव्य केले आहे.

पन्हाळा किल्ला हा एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असून, या गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजवाडा, तीन दरवाजा, सज्जाकोठी, अंबरखाना, अंधारबाव, तटबंदी अशी अनेक स्थळे या किल्ल्यावर प्रसिद्ध आहेत.

निसर्गरम्य परिसर, उंचीवरून दिसणाऱ्या खोल दऱ्या, अल्हाददायक वातावरण या परिसराला एक उत्तम पर्यटन स्थळ बनवतो.

कोल्हापूर पासून अंतर - जोतिबा पासून १० किलोमीटरवर व कोल्हापूर पासून २० किलोमीटरवर

img-1 img-3
shape img-4

नरसिंहवाडी (नरसोबाची वाडी)

कोल्हापूरपासून सुमारे ५८ किलोमीटरवर कृष्णा आणि पंचगंगा या नंद्यांच्या संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. दत्ताचा अवतार असणारे श्री नरसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या गावाला नरसिंहवाडी असे म्हणतात. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे. मंदिरातच नरसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरु असते.

नदीचे पात्र, घाट देऊळ त्यामागचा औदुंबराचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते व परिसरातील शांत, प्रसन्न वातावरण मनाला भावून जाते. या मंदिराशिवाय येथील पेढे, बर्फी व बासुंदी विशेष प्रसिद्ध आहेत.

कोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून पूर्वेस ५५ किलोमीटर वर.

temple-2
img-5 img-6

कुंभोज येथील बाहुबली

कोल्हापूर पासून २७ किलोमीटर अंतरावर बाहुबली पर्वतावर 'बाहुबली' मंदिर वसले आहे. हे क्षेत्र कुंभेजगिरी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. बाहुबली मंदिर हे जैन धर्मियांचे एक प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे.

कोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून २७ किलोमीटर वर हे बाहुबली मंदिर वसले आहे.

img-7

विशाळगड

निसर्गाच्या सानिध्यात वसलेला विशाळगड हा येथील दर्गा आणि किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील अमृतेश्वर मंदिर, टकमक टोक, सती वृंदावन आणि हजरत मलीक रेहान बाबांचा दर्गा प्रसिद्ध आहेत. असंख्य भाविक या दर्ग्याला भेट देण्यासाठी येतात.

कोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून उत्तर पश्चिमेस ७६ किलोमीटरवर विशाळगड वसले आहे.

img-8

आंबोली

हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात.

आंबोलीच्या नजीकच्या परिसरात सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. येथील हिरण्यकेशी नदी मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. नदीवर १० कि.मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे. महादेवगड, मनोहरगड आदि जुने किल्लेही नजीकच्या अंतरावर आहेत.

आंबोलीचे जंगल दाट असल्याने सभोवतालच्या परिसरात अनेकदा रानडुकरे, ससे, गवे, बिबटे, चितळ आदी वन्य प्राणी आढळतात. सहसा न दिसणार्या पक्ष्यांचेही येथे दर्शन होते.

temple-2
img-5 img-6

गोकाकचा धबधबा

कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा नदीवर गोकाकचा सुंदर धबधबा स्थित आहे. भारतातील 'नायगरा' धबधबा म्हणून सुद्धा हा धबधबा प्रसिद्ध आहे. पर्यटन व निसर्गप्रेमीं साठी हा धबधबा एक उत्तम ठिकाण असून येथील झुलता पूल अनुभवण्या सारखा आहे.

कोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून १३२ किलोमीटरवर कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात गोकाक वसले आहे.

img-12

राधानगरी धरण

एक शतकापासून दिमाखात उभे असणारे राधानगरी धारण हे भोगावती नदीवर बांधण्यात आले आहे. कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराजांनी या धरणाचे बांधकाम त्यांच्या काळात करून घेतले. वीजनिर्मिती व कोल्हापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने हे धरण बांधण्यात आले.

स्वयंचलीत दरवाजे व आजूबाजूच्या निसर्गरम्य अशा परिसरामुळे राधानगरी धरण हे कोल्हापुरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या धरणाच्या सभोवतालच्या जंगलात विविध जातीचे सुंदर पक्षी आढळतात.

कोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूर पासून ५५ किलोमीटरवर राधानगरी तालुक्यात हे धरण आहे.

img-13

बर्की

वर्षा पर्यटनांपैकी एक असणारा बर्की धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. पावसाळ्यात अधिक खुलून दिसणाऱ्या या धबधब्याचा भोवतालचा निसर्गरम्य परिसर व येथे असणारे पाणथळ पर्यटकांन साठी पर्वणी आहे. शहरी गोंगाटापासून दूर निसर्गसोंदर्य अनुभवण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे.

कोल्हापूर पासून अंतर - कोल्हापूरपासून ४५ किलोमीटरवर हा धबधबा आहे.

img-14

खिद्रापूर

कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर) हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. या मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या रचनेत आहे. छोटय़ाशा दरवाजातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश झाल्यावर समोर कित्येक शतकांचा इतिहास उलगडत जातो. देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला छत नाही. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे

img-15