उत्सव - खेटे
माघ महिन्यात पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या खेट्याचं वैशिष्ट्य असे आहे की, फक्त्त कोल्हापूरचेच भाविक हे खेटे घालतात. या बाबतची आख्यायिका अशी, पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयातकडे परत निघाले. हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीला कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी पायाने पळत आली व केदारनाथला न जाण्याविषयी विनवणी केली. तेंव्हा केदारनाथाने जोतिबावर राहण्याचे मान्य केले. तेंव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे.