महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे लोकदैवत व 'वाडी रत्नागिरी' या नावाने परिचित असलेले 'श्री जोतिबा देवस्थान' हे कोल्हापूर शहराच्या वायव्येस साडेसतरा किलो मीटरवर जोतिबा डोंगरावर वसले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवर निसर्गरम्य अशा परिसरात हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर म्हणजे तीन मंदिरांचा समूह असून यातील मुख्य मंदिर हे प्राचीन आहे व उर्वरीत दोन मंदिरे हि अठराव्या शतकात बांधण्यात आल्याचा उल्लेख सरकार दरबारी आढळतो.
पहाटे ४:०० वाजता
घंटानादाने मंदिर उघडते
पहाटे ५:०० वाजता
पाद्यपूजा व काकडआरती
सकाळी ८:०० वाजता
पंचामृत अभिषेक
सकाळी ९:०० वाजता
सुवर्ण अलंकार अर्पण करून महापूजा ( खडीपूजा )
सकाळी ९:३० वाजता
धुपारती व महानैवेद्य
दुपारी ३:०० वाजता
स्नान अभिषेक व बैठी पूजा
सायं ७:०० ते ९:०० वाजता
धुपारती व शेजारती, विरागी / साधी पूजा
रात्री ११:०० वाजता
मंदिर बंद केले जाते
भगीरथी तूही हिमाचल वाशी । नलगत पलखल दुर्जन संहारी त्याशी ।
तो हा हिम केदार करवीरा पाशी । रत्नागिरीवर शोभे कैवल्य राशी ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदार । दासा संकटवारा भव भय निवारा ।।१।।
उत्तरेचा देव दक्षिणी आला । दक्षिण केदार नाम पावला ।
रत्नासूर मर्दूनी भक्ता पावला । दास म्हणे थोर भाग्या लाभला ।
जयदेव जयदेव जय जय श्री केदार । दासा संकटवारा भव भय निवारा ।।२।।